News Flash

जुन्नर – राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे जिल्ह्यात करोना महाराचाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. पुण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना करोनाचा संसर्ग झाला आहे. जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रसचे नगरसेवक दिनेश दुबे यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. आज, रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्या मृत्यू झाला आहे. दुबे यांच्या जाण्यानं जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते.

दुबे यांनी जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्षही भूषावलं होतं. सध्या ते विद्यमान नगरसेवक होते शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. रविवारी पहाटे दुबे यांचा करोनामुळे पुण्यातील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकळी त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:32 pm

Web Title: junnar ncp senior leader dinesh dubey died due to corona in pune nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशभरात उद्यापासून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू
2 करोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची अडचण
3 पुण्यात दिवसभरात आढळले १,८३८ करोनाबाधित रुग्ण; १८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X