हमाल पंचायतीच्या ‘कष्टाची भाकर’च्या वतीने यंदाही कष्टकऱ्यांसाठी स्वस्त दरात दर्जेदार लाडू- चिवडा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
 मागील वर्षी याच उपक्रमाच्या माध्यमातून ३० हजार किलो लाडू- चिवडय़ांचे ८५ रुपये किलो या दराने वितरण करण्यात आले होते. यंदा साहित्याच्या किमती वाढल्या असल्या, तरी दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. हमाल भवन येथे लाडू- चिवडा तयार करण्यात येत आहे. ‘कष्टाची भाकर’च्या विविध केंद्रांवर लाडू- चिवडय़ाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. लाडू- चिवडा उपक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते झाले. हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, आडते असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक शिवलाल भोसले, बाजार समितीचे सचिव ज्ञानेश्वर आदमाने, पंचायतीचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, संघटक गोरख मेंगडे, ‘कष्टाची भाकर’चे व्यवस्थापक दिलीप मानकर आदी त्या वेळी उपस्थित होते.
उद्घाटप्रसंगी घेले म्हणाले,की खिशात चार पैसे खुळखुळणाऱ्यांना दिवाळी आली की उत्साहाचे आनंदाचे भरते येते. परंतु आजचा दिवस गेला, उद्याचे काय, याची चिंता असणाऱ्या दुबळ्या घटकाला सण कसा साजरा करायचा याची चिंता वाटते. त्या वेळी कष्टाच्या भाकरीच्या ‘स्वस्तात लाडू- चिवडा’ उपक्रमामुळे कष्टकऱ्यांची दिवाळीही गोड होते. हमाल पंचायतीच्या या वार्षिक उपक्रमाचा कष्टकऱ्यांना आधार वाटतो.
शिवलाल भोसले म्हणाले,की आम्ही आडते असलो, तरी हमाल पंचायतसारखी चळवळ राबवित असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांबरोबर राहण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
उपक्रमाविषयीची भूमिका सांगताना डॉ. आढाव म्हणाले, की हमाल पंचायत ही हातावर पोट असणाऱ्या घटकांची संघटना आहे. मात्र, असंघटितांच्या संघटनेने जी सामाजिक जाणीव सातत्याने ठेवली, तशी संघटितांच्या संघटना का ठेवत नाहीत, हा प्रश्न आहे. तुम्ही जनतेबरोबर राहिलात, तरच जनता तुमच्या बरोबर राहील. याबाबतचे भान सार्वजनिक जीवनातील व्यक्ती, संघटना यांनी सातत्याने ठेवली पाहिजे.  

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका