News Flash

खडकवासला धरणातून विसर्ग सुरू

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे.

गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के  भरले. त्यानंतर या धरणातून १० हजार ९६ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांत ५८ टक्के  पाणीसाठा

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के  भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर धरणांच्या परिसरात ओढ दिलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून पुनरागमन के ले. सलग चौथ्या दिवशी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण गुरुवारी सकाळपर्यंत ७३ टक्के  भरले होते. मात्र, दिवसभर पाऊस सुरूच असल्याने ४.३० वाजता हे धरण १०० टक्के  भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात तब्बल २५० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात अनुक्रमे १५३ आणि १५५ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात १९० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांत अनुक्रमे १०१ आणि ९५ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात १५ मि.मी. पाऊस पडला. सध्या चारही धरणांत मिळून एकू ण १६.३७ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ५८.१८ टक्के  पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात तब्बल २३२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या धरणात सध्या ४.६९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्य़ाच्या अन्य धरणांच्या परिसरातही दिवसभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कळमोडी धरणही १०० टक्के  भरले असून या धरणातून ५९७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर या धरणांच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणातून के लेल्या विसर्गाचा आढावा

पाऊस सुरू झाल्यानंतर यंदा हंगामात प्रथमच २२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के  भरले आणि या धरणातून १० हजार ९६ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. सन २०२० मध्ये हे धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के  भरले आणि मुठा नदीत १७१२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. सन २०१९ मध्ये खडकवासला धरण ११ जुलै रोजी १०० टक्के  भरले आणि १७१२ क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले होते. सन २०१८ मध्ये १६ जुलैला हे धरण १०० टक्के  भरले आणि नदीपात्रात १७१० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते, तर सन २०१७ मध्ये २४ जुलै रोजी खडकवासला धरण प्रथम भरले आणि ५१३६ क्युसेकने या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 3:52 am

Web Title: khadakwasla dam pune heavy rain ssh 93
Next Stories
1 भूमिगत मेट्रोच्या बोगद्याचे काम कसबा पेठेपर्यंत पूर्ण
2 सलग दुसऱ्या आठवडय़ात संसर्गाचा दर ४ ते ५ टक्क्य़ांवर स्थिर
3 जिल्ह्य़ात दरड कोसळण्याच्या घटना