20 October 2020

News Flash

पुणे : खडकवासला १०० टक्के भरले; मुठा नदीत २२ हजार क्युसेकने पाणी सोडले

मुठा नदीलगतच्या भागात महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदीपात्रातील मेट्रो प्रकल्पाचे काम सात दिवसांसाठी थांबविण्यात आले आहे.

खडकवासला धरण

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणातून नदीपात्रात करण्यात येत असलेल्या विसर्गामध्ये सोमवारी रात्री दहा वाजता वाढ करण्यात आली. सोमवारी २२ हजार ८८० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीलगतच्या भागात महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदीपात्रातील मेट्रो प्रकल्पाचे काम सात दिवसांसाठी थांबविण्यात आले आहे.

धरणांच्या क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून नदीपात्रात पाणी सोडण्यास जलसंपदा विभागाकडून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली असतानाच पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे रात्री २२ हजार ८८० क्युसेक या प्रमाणे नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा आणि महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या परिसरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून १८ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली जातो. त्यानंतर२८ हजार क्युसेक पाणी सोडल्यास आबासाहेब गरवारे महाविद्याालयाजवळील खिलारे वस्ती बाधित होते, तर त्यानंतर ३३ हजार क्युसेक पाणी सोडल्यावर डेक्कन परिसरातील शितळादेवी आणि ५४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर महापालिका भवनाशेजारील टिळक पूल पाण्याखाली जातो. साठ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रालगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरते.

सध्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदीपात्रातील मेट्रोचे कामही सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाºयांकडून देण्यात आली. नदीपात्रात मार्गिकेसाठी खांब उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्रेनसह अन्य अवजड यंत्रांच्या साहाय्याने हे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महामेट्रोकडून ही यंत्रे हटविण्यास सुरुवात झाली. आता पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्यामुळे पुढील सात दिवस काम बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 11:12 pm

Web Title: khadakwasla filled 100 percent 22 thousand cusecs of water leave in mutha river
Next Stories
1 पुणे : खडकवासला १०० टक्के भरले; मुठा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडणार
2 दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात ‘पुंगी बजाओ’ आंदोलन
3 Pune Accident: मोठ्या भावाचे ऐकले असते तर प्रतीक वाचला असता
Just Now!
X