27 September 2020

News Flash

धरणे निम्मी भरली

सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. परिणामी धरणे निम्मी भरली असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीसाठा १५.०३ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ५१.५६ टक्के  एवढा झाला.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. सोमवारी (३ ऑगस्ट) रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. सतत कोसळणारा पाऊस गुरूवारी सायंकाळपर्यंत कायम होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ८५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ८० मि.मी., पानशेत धरण परिसरात ८२ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

तर, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरणात ४५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणात अनुक्रमे ३७ आणि ३१ मि.मी., तर खडकवासला धरणात १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सोमवापर्यंत चारही धरणांत ९.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. हा पाणीसाठा गुरुवारी सायंकाळपर्यंत १५.०३ टीएमसी म्हणजेच ५१.५६ टक्के  एवढा झाला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात ५४ मि.मी. पाऊस झाल्याने या धरणात ३.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. अन्य महत्त्वाच्या धरणांपैकी गुंजवणी, नीरा देवघर, भामा आसखेड आणि भाटघर धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गुंजवणी धरण परिसरात ७३ मि.मी., नीरा देवघर धरणात १०० मि.मी., भामा आसखेड धरणात २० मि.मी. आणि भाटघर धरणात ५९

मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्य़ाच्या सीमेवर असलेल्या उजनी धरण परिसरात दिवसभरात एक मि.मी. पावसाची नोंद झाली.

खडकवासला धरणात ७७ टक्के  पाणीसाठा

धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने खडकवासला धरणात ७७.७३ टक्के  पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत संततधार  सुरूच होती. त्यामुळे या धरणातून मुठा उजवा कालव्यातून ३०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, धरण क्षेत्रातील पावसाने उघडीप दिल्याने तूर्त हा विसर्ग थांबवण्यात आला आहे. हे धरण १०० टक्के  भरले, तरच मुठा नदीत पाणी सोडण्यात येईल, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी

टेमघर १.१८ (३१.९५), वरसगाव ६.१४ (४७.९२), पानशेत ६.१७ (५७.९२), खडकवासला १.५३ (७७.७३), पवना ३.५९ (४२.१८), डिंभे ५.०६ (४०.५०), भामा आसखेड ३.५७ (४६.६३), गुंजवणी २.६२ (७१.०२), निरा देवघर ४.९७ (४२.३८), भाटघर १२.९४ (५५.०६), वीर ६.०४ (६४.१६) आणि उजनी ७.६९ (१४.३६).

(कं सात टक्के वारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:45 am

Web Title: khadakwasla half full after heavy rainfall zws 70
Next Stories
1 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द, विनंती केली तरच बदलीचे निर्देश 
2 बनावट ऑनलाइन भाडेकरारांच्या प्रकारांमध्ये वाढ
3 पुण्यात एका दिवसात २७ करोना रुग्णांचा मृत्यू, पिंपरीत २४ मृत्यू
Just Now!
X