News Flash

महोत्सवाच्या नावाखाली पदपथांवर अतिक्रमण

सिंहगड रस्त्यावर शिवसेनेचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे.

सिंहगड रस्त्यावर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण महोत्सव, आंबा महोत्सवांनी पदपथ अडवले; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : शहरातील पदपथांवर विविध कारणांमुळे अतिक्रमणे होत असतानाच आता महोत्सवांच्या नावाखाली पदपथांवर अतिक्रमणे होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शेतमालास रास्त भाव मिळावा यासाठी कोकण महोत्सव, आंबा महोत्सव अशा प्रकारचे महोत्सव पदपथांवर भरवण्यात आले आहेत. पदपथांवरील या अतिक्रमणांकडे महापालिका प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत असून या महोत्सवांचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. सिंहगड रस्त्यावर शिवसेनेचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे.

शहरातील पदपथांवर मोठय़ा प्रमाणावर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. मुळातच पुरेसे आणि प्रशस्त नसलेल्या पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान-मोठय़ा पथारी व्यावसायिकांबरोबरच राजकीय पक्षांची जनता संपर्क कार्यालयेही पदपथांवरच राजरोजसपणे थाटण्यात आली आहेत. हे अतिक्रमण एवढय़ा पुरतेच मर्यादित राहिलेले नाही. शेतकरी आठवडी बाजार, विविध प्रकारचे महोत्सवही आता पदथांवरच भरवण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाची किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलानजीक आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने ही बाब पुढे आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्यामुळे आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. त्याबाबतची प्रसिद्धीही फलकांच्या माध्यमातून करण्यात आली असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू झालेला हा कोकण महोत्सव रविवार (६ मे) पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात आंब्याची विक्री करणारे स्टॉल एका सलग पदपथांवर थाटण्यात आले आहेत. शेतकरी ते ग्राहक या नावाखाली महोत्सव आयोजित करून पदपथावर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे नागरिकांकडूनही महापलिका प्रशासनाकडे तशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित महोत्सवाला कोणतीही परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या दृष्टीने महोत्सव किंवा आठवडी बाजार उपयुक्त ठरतात. मात्र मिळेल त्या जागेत हे महोत्सव आयोजित करण्यात येत असल्यामुळे महोत्सव नागरिकांच्या विशेषत: पादचाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहेत. महोत्सवांवर कारवाई न करण्यासंदर्भात प्रशासनावर असलेल्या दबावामुळेच महोत्सवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सिंहगड रस्त्यावर फन टाईम शेजारील कालव्यालगतच्या सेवा रस्त्यावर आठवडी बाजार सुरू करण्यात आला होता. मात्र तो आठवडय़ातून एकदा भरण्याऐवजी दररोज सुरू असल्याचे आणि त्यासाठी स्टॉलधारकांनी काही प्रमाणात बांधकाम केल्याची बाबही पुढे आली होती. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर या आठवडीबाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:52 am

Web Title: kokan festival mango festival blocked footpath in pune
Next Stories
1 बांधकाम मजुरांच्या मुलांनी ‘आकाशवाणी’चे विश्व अनुभवले!
2 पिंपरी महापालिकेत ३०० जणांकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही
3 उज्ज्वला योजनेतून लाकूड न पेटवणारी गावे तयार करण्याचा प्रयत्न
Just Now!
X