शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालावर टाळाटाळ

पुणे : कोरेगांव पार्क परिसरातील साधू वासवानी पुलाची कमान आणि अन्य काही भाग धोकादायक असल्याने तो पाडून नव्याने उभारावा, असा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला आहे. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता पुलाची दुरुस्ती करणे तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे. त्याऐवजी नव्याने पूल बांधल्यास तो प्रदीर्घ काळ वापरता येईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले असतानाही पुलाची दुरुस्ती करायची की तो नव्याने बांधायाचा याबाबत सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली महापालिके कडून सुरू झाल्या आहेत.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा

कोरेगांव पार्क परिसरात या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. महापालिके च्या स्थायी समितीने मार्च २०१८ मध्ये शहरातील जुन्या पुलांचे, रेल्वे उड्डाणपुलांचे तांत्रिक लेखापरीक्षण आणि तपासणी करण्याचा निर्णय घेतला. हा पूल ५०० मीटर लांबीचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तो बांधला आहे. गेल्या १५ वर्षापूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे या पुलाचे लेखापरीक्षण करण्याचे काम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्यात आले. या दरम्यान, पुलावरून धोकादायक वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली होती.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने याबाबतचा अहवाल महापालिके च्या प्रकल्प विभागाला सादर के ला आहे. पुलाच्या कमानी नादुरुस्त झाल्या असून काही भाग धोकादायक झाला आहे. त्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी तो पाडावा आणि नव्याने पूल उभारावा. नव्याने पूल उभारल्यास तो प्रदीर्घ कालावधीसाठी वाहतुकीला उपलब्ध होईल. तात्पुरती दुरुस्ती के ल्यास पुन्हा काही वर्षात त्याची डागडुजी करावी लागेल. यात पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होईल, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने महापालिके ला दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवाल स्पष्ट असतानाही महापालिके कडून त्यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ के ली जात आहे. पूल पाडायचा की डागडुजी करायची, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. पुलाची दुरुस्ती के ल्यास २५ वर्षे तो टिके ल, असा महापालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे. मात्र त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा घाट घातला जात आहे.

पुलांचे लेखापरीक्षण

महापालिके ने आत्तापर्यंत होळकर पूल, बोपोडी पूल, औंध-वाकड पूल, जुन्या संगम पुलाबरोबरच पौड फाटा, पौड रोड उड्डाणपूल, नीलायम चित्रपटगृह उड्डाणपुलांचे लेखापरीक्षण करून घेतले आहे. त्याचबरोबर संचेती रुग्णालय, अलंकार चित्रपटगृह, कोरेगांव पार्क आणि हडपसर येथील रेल्वे उड्डाणपुलांचेही तांत्रिक लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. मुळा नदीवर १५, तर मुळा नदीवर १० पूल आहेत. मुळा-मुठा नदीपात्रात सहा पूल असून १८ उड्डाणपूल शहरात आहेत. शहरातील रेल्वे उड्डाणपुलांची एकू ण संख्या ८ एवढी आहे.