24 September 2020

News Flash

तालुक्याच्या ठिकाणी बसून शेतकरी पाहणार कृषी प्रदर्शन!

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी वसंत २०१४ ’ या राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळाद्वारे पाहण्याची व्यवस्था केली आहे.

| February 8, 2014 03:07 am

एखाद्या मोठय़ा कृषी प्रदर्शनाला जाऊन आधुनिक शेतीबाबतची माहिती जाणून घेण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते. पण, शेती किंवा इतर कामांमुळे सर्वाना प्रदर्शनाला जाणे शक्य होतेच असे नाही. पण आता पुढील आठवडय़ात नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन तालुक्याच्या ठिकाणाहून पाहणे शक्य होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळाद्वारे पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्य़ातील अकरा तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनातील अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तालुक्याला बसून शेतकरी घेणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी वसंत २०१४ ’ हे राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शन ९ ते १३ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन येथे होणार आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच बरोबर विविध कृषी तज्ज्ञांचा परिसंवाद आणि चर्चा होणार आहे. यामध्ये तज्ज्ञांचे आधुनिक शेती करण्यावरील मार्गदर्शनाचा लाभ प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रदर्शनाला देशभरातून तीन लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी, व्यापारी, ग्राहक भेट देण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्य़ातून चार हजार शेतकरी भेट देणार आहे.
पुणे जिल्ह्य़ातील ज्या शेतक ऱ्यांना नागपूर येथे हे प्रदर्शन पाहण्यासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी तालुकास्तर कृषी प्रदर्शनाचे संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  पुणे जिल्ह्य़ातील बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुणे, हवेली, भोर, दौंड, शिरूर, मुळशी, मावळ, वेल्हा आणि सासवड अशा तेरा तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पाच दिवस हे प्रदर्शन पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.   www.india.gov.in आणि  agriwebcast.nic.in या संकेतस्थळावर हे प्रदर्शन पाहता येणार आहे.  कृषी विभागांर्तगत व पणन मंडळार्तगत समाविष्ट कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रदर्शन पाहण्याची सोय केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे अवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे संचालक जीवन बुंदे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:07 am

Web Title: krishi vasant 2014 exibition
Next Stories
1 चिमुकल्या विद्यार्थ्यांची रिक्षा ‘भक्कम’ होणार तरी कधी?
2 धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर
3 शिरूरच्या पराभवाचे राष्ट्रवादीला ‘कोडे’; दिलीप वळसे, लांडे यांनी उलगडले ‘गुपित’
Just Now!
X