06 July 2020

News Flash

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाल कुमार

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.

| August 19, 2014 05:57 am

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. कुणाल कुमार हे १९९९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे आयुक्तपद रिक्त होते.
पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन बदली केली. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2014 5:57 am

Web Title: kunal kumar will be new commissioner of pune municipal corporation
टॅग Pmc
Next Stories
1 मोदी लाट आहे या भ्रमात राहू नका – नितीन गडकरी
2 परीक्षेपेक्षा पुनर्मूल्यांकन महाग
3 शिक्षण नववीपर्यंतचे; लेखन तीन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात!
Just Now!
X