News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा वाटणार १० लाख लाडू; आमदारांना पोलिसांची नोटीस

करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम न घेण्याचा प्रस्ताव

भोसरी : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्यावतीनं शहरात लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सुरु असलेली तयारी.

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहनही भाजपाकडून करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये १० लाख लाडू वाटपाचा कार्यक्रम घोषित केला आहे. मात्र, पोलिसांनी यावर आक्षेप घेतला असून आमदार लांडगे यांना नोटीस पाठवली आहे.

पोलिसांनी आमदार लांडगे यांना मंगळवारी (४ ऑगस्ट) रोजी सीआरपीसी १४९ अंतर्गत ही नोटीस पाठवली असून यामध्ये म्हटले की, “राम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने उद्या (५ ऑगस्ट) ठिकठिकाणी लाडू वाटून आनंद साजरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण हा लाडू वाटपाचा कार्यक्रम करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.”

सध्याच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गर्दी झाल्यास ती करोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरु शकते. त्यामुळेच पोलिसांनी लांडगे यांना लाडू वाटपाचा जाहीर कार्यक्रम न घेण्याबाबत नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आता लांडगे याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शहरातील ४० प्रमुख शहरांमध्ये होणार लाडू वाटप

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येणार असल्याचे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले होते. इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची करोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 9:31 am

Web Title: laddu to be distributed on the occasion of ram mandir bhumi pujan police send notice to mla mahesh landage aau 85 kjp 91
Next Stories
1 पुणे : धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस; २४ तासांत पाणीसाठ्यात ३ टीएमसीने वाढ
2 २४ तासांत शहराला २५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा
3 व्यापारी संकुले, निवासी हॉटेल आजपासून सुरू
Just Now!
X