18 September 2020

News Flash

मैत्रीण व तिच्या आईवर चाकूने हल्ला करून तरूणीने केले स्वत:ला जखमी

पिंपरी येथील अजमेरा कॉलनी येथे एका तरूणीने मैत्रीण व तिच्या आईवर चाकूने हल्ला करून स्वत:ला जखमी करून घेतल्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला.

| June 15, 2013 02:55 am

पिंपरी येथील अजमेरा कॉलनी येथे एका तरूणीने मैत्रीण व तिच्या आईवर चाकूने हल्ला करून स्वत:ला जखमी करून घेतल्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला.  तिघींवरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला करणाऱ्या तरूणीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागील कारण मात्र समजू शकलेले नाही.
श्वेताली धावरे (वय १९) असे हल्ला करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. तिने केलेल्या हल्ल्यात तिची मैत्रीण स्टेफी सॅम्युअल (वय २१) आणि तिची आई लिलम्मा सॅम्युअल (वय ५५, रा. अजमेरा कॉलनी, िपपरी) या जखमी झाल्या आहेत. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताली ही गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास स्टेफीच्या घरी आली. थोडा वेळ झाल्यानंतर स्टेफी ही काही कामानिमित्ताने आतल्या खोलीत गेली. त्या वेळी तिला तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती धावत बाहेर आली, त्यावेळी तिच्या आईवर श्वेताली ही चाकूने वार करताना दिसली. तिने अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्टेफीवरही वार केले. त्यानंतर श्वेतालीने स्वत:वर ही वार करून घेतले. या मध्ये तिघीही जखमी आहेत. या घटनेत स्टेफीची आई गंभीर जखमी आहे. या सर्वावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी श्वेतालीवर शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.डी. भुतेकर अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:55 am

Web Title: lady attacked her friend and friends mother herself injured
Next Stories
1 ‘भाईगिरी’च्या नादात तरुणांमध्ये पिस्तूल बाळगण्याची धुंदी
2 सत्तर टक्के ज्येष्ठ नागरिकांवर होताहेत अत्याचार! – पोलिसांकडे पोहोचतात केवळ दीड टक्के
3 जुलै-ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस! – दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर; जुलै १०१ टक्के, तर ऑगस्ट ९६ टक्के
Just Now!
X