28 February 2021

News Flash

पुण्यात आणखी एकाला करोनाची लागण

पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

पुण्यात एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुण्यातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. संबंधित महिला काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावरून आल्याची माहितीही मिळाली आहे.

पुण्यात एक महिला करोना बाधित रुग्ण आढळल्या असून पुण्यात करोनाच्या रूग्णांची संख्या १८ झाली झाली. संबधित महिला ही १४ मार्च रोजी नेदरलँड आणि फ्रान्सचा प्रवास करून आला होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

१६ जणांची प्रकृती स्थिर
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवलेल्या २८ नागरिकांच्या वैद्यकीय नमुन्यांपैकी २७ नागरिकांचे वैद्यकीय नमुने तपासले असता त्यांना करोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील १६ करोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी दिली होती. सध्या २८ पैकी २७ जणांच्या वैद्यकीय नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 10:42 am

Web Title: lady found corona positive report numbers increased in pune svk88 jud 87
Next Stories
1 व्यापाऱ्यांचा बंद; बाजारात शुकशुकाट
2 किरकोळ गुन्ह्य़ातील कैद्यांना जामीन देण्याची शिफारस
3 आरोग्य यंत्रणांची बळकटी हेच दीर्घकालीन धोरण हवे!
Just Now!
X