पिंपरी महापालिकेच्या वतीने प्रभागनिहाय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या क्षेत्रीय सभेत गुरुवारी खराळवाडीत तुंबळ हाणामारी झाली. खुच्र्याची फेकाफेक, महिलांमध्ये झटापट, अर्वाच्च शिवीगाळ, पिस्तुलाचा धाक आणि सर्वत्र पळापळ असे वातावरण क्षेत्रसभेत दिसून आले. राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांना काही महिलांनी या वेळी मारहाण केली. दोन गटातील हा राडा बराच वेळ सुरू होता. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दोन्ही गटांनी परस्परांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी थेट संवाद असे स्वरूप असलेल्या प्रभागनिहाय क्षेत्रीय सभांचे आयोजन पालिकेकडून करण्यात येते. त्याअंतर्गत गुरुवारी दुपारी चार वाजता खराळवाडी प्रभागात बालभवन येथे क्षेत्रसभा सुरू झाली. नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू कदम व महिला बालकल्याणच्या सभापती मंचरकर यांचे समर्थक मोठय़ा संख्येने आले होते. एकमेकांचे कडवे विरोधक असलेले दोन्ही गट सभेच्या निमित्ताने समोरासमोर आल्याने सुरुवातीपासून तणाव होता, त्यातून अपेक्षित उद्रेक घडला. सभेत नागरिकांनी तक्रारी मांडण्यास सुरुवात केली. महिंद्रा कंपनीच्या आवारात सुरू असलेल्या बांधकामामुळे गांधीनगर येथील रहिवाशांना खूप त्रास होतो. वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही, असा मुद्दा एका कार्यकर्त्यांने उपस्थित केला. तेव्हा त्यास कदम यांनी थांबवले. त्याला बोलू द्या, असा आग्रह मंचरकर यांनी धरला. या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसन तुबंळ हाणामारीत झाले. एकमेकांवर खुच्र्या फेकण्यात येऊ लागल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. काही महिलांनी नगरसेविका मंचरकर यांना केस धरून खाली ओढले व मारहाण केली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ हाणामारी सुरू होती. या गोंधळात पिस्तूलही काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी संत तुकारामनगर येथे परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

आधी आघाडी; आता शत्रुत्व
गीता मंचरकर व सद्गुरू कदम दोघेही काँग्रेसचे नगरसेवक असून एकाच पॅनेलमध्ये एकमेकांना मदत करून निवडून आले आहेत. नंतरच्या काळात त्यांच्यात वाद झाले, ते वाढतच गेले. परिणामी, मंचरकर आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देऊ केले. कदम व मंचरकर यांच्यात गेल्या काही महिन्यापासून तीव्र वाद आहेत. यापूर्वीही दोन्ही गट आपापसात भिडले आहेत. गुरुवारी क्षेत्रसभेत राडा होणार, याची कुणकुण अनेकांना होती. त्यामुळेच दोन्ही गट तयारीत आले होते. आपल्यावर पिस्तूल रोखण्यात आल्याचा आरोप सद्गुरू कदम यांनी केला आहे तर त्या महिलांनी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गीता मंचरकर यांनी केला आहे.

power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
ठाण्यात महायुतीचा उमेदवार कोण ? शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सूचक विधान