30 September 2020

News Flash

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी तातडीने भूसंपादनाची मागणी

यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाबरोबर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत होणाऱ्या चांदणी चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी आवश्यक असणारे भूसंपादन पुणे महानगरपालिकेने तातडीने करावे, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील २.२ किमी लांबीच्या रस्त्यावरील या कामासाठी अंदाजे एक लाख ६० हजार चौरस मीटर इतके भूसंपादन आवश्यक असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार ही मागणी केली असल्याचे शिरोळे यांनी या वेळी सांगितले. चांदणी चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी खासदार शिरोळे यांनी नुकतीच बठक आयोजित केली होती. या बठकीला राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणचे अधिकारी सुहास चिटणीस, मििलद वाबळे, तसेच महापालिकेतर्फे श्रीनिवास बोनाला, प्रकल्प सल्लागार कंपनीचे प्रताप राजू आदि उपस्थित होते.बठकी दरम्यान कात्रज देहूरोड बाह्य़वळण मार्गालगत हिरवाई निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचनाही दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:29 am

Web Title: land equation for bridge construction in punec
Next Stories
1 हातमागावर पारंपरिक पठणी साडय़ांचे वीणकाम पाहण्याची संधी
2 वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी विशेष मोहीम
3 घरात शिरलेल्या चोरटय़ाकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण व लूट
Just Now!
X