|| राहुल खळदकर

दरात मोठी वाढ; महत्त्वाची गुऱ्हाळे बंद असल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

पुणे : गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या धास्तीमुळे घराघरांत आयुर्वेदिक काढे करून पिण्याचे वाढलेले प्रस्थ आणि राज्यातील प्रमुख पेठांमधील गुऱ्हाळे बंद झाल्यामुळे पुरवठ्यावर झालेला परिणाम यांमुळे गेल्या काही दिवसांपासून गुळाच्या दरांत वाढ झाली आहे.

गुळाच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारातही गुळाच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली असून गुळाची विक्री प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये दराने केली जात आहे.

महाराष्ट्रात गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूर, कराड, तसेच लातूर भागातील गुऱ्हाळे सध्या बंद आहेत. ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंत पररराज्यातील गुऱ्हाळे सुरू असतात. तेथील गुळाचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे परराज्यासह महाराष्ट्रातील प्रमुख पेठांमधील गुऱ्हाळांमधील उत्पादन बंद आहे. उत्पादन बंद असतानाच मागणी वाढल्याने गुळाच्या दरात वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात असलेल्या पाटस, केडगाव, यवत परिसरात गुऱ्हाळे आहेत. या भागातील गुऱ्हाळे सध्या सुरू आहेत. त्याबरोबरच सांगली, कर्नाटकातील मंडिया भागातील गुऱ्हाळे सुरू आहेत. त्यामुळे तेथील गुळाला मागणी आहे, अशी माहिती पुणे मार्केटयार्डातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

 

कारणे काय?

गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढते, असे सांगितले जात असून अनेक आयुर्वेदिक काढ्यात गुळाचा वापर केला जातो. अनेक शहरांमध्ये गुळाचा चहा विकणारी उपाहारगृहे सुरू झाल्यानेही गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे.

 काढ्यामुळे…

करोनाच्या संसर्गामुळे आयुर्वेदिक काढे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. गूळ, लवंग, वेलची तसेच अन्य आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून काढा तयार केला जातो. काढ्याबाबत घराघरांतील उत्साहामुळे गुळाची मागणी वाढली असून त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

एप्रिल महिन्यापासून…

उसाचे दर वाढले असून शिल्लक ऊ स संपला आहे. मे महिन्याच्या अखेरीस साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची अखेर झाली. एप्रिल महिन्यापासूनच गुळाच्या दरात तेजी आहे. घाऊक बाजारात गुळाचे क्विंटलचे दर ३२०० ते ३६०० रुपये असे असून (दहा किलोची ढेप) बॉक्स पॅकिंगचे (वीस किलो) क्विंटलचे दर ३६०० ते ४५०० रुपये आहेत. सेंद्रिय गुळाचे एक क्विंटलचे दर ४२०० ते ४८०० रुपये असे आहेत. गेल्या वर्षभरापासून हवाबंद डब्यातील गूळ विक्रीस उपलब्ध झाला आहे. त्यालाही चांगली मागणी आहे.