News Flash

पाडव्याला आंबा महाग!

चढय़ा दरामुळे ग्राहकांची पाठ

चढय़ा दरामुळे ग्राहकांची पाठ

पुणे : गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्यांची मोठी आवक होते. यंदाच्या वर्षी पाडव्याला आंब्यांचे दर चढे आहेत. चढय़ा दरामुळे ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दरवर्षी पाडव्याला आंब्याला चांगली मागणी असते. मात्र, करोनाचा संसर्ग वाढत असल्याने आंब्यांची आवक तशी कमी झाली आहे. दरवर्षी पाडव्याला आंब्याच्या साडेचार ते पाच हजार पेटय़ांची आवक बाजारात होते. यंदा आंब्यांची आवक कमी झाली आहे. रत्नागिरीहून तीन हजार आंब्यांच्या पेटय़ा मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या, अशी माहिती आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

आंबा महाग असल्याने किरकोळ खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. करोनाच्या संसर्गामुळे आंबा विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. संसर्ग नसता तर आंबा खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाली असती. ग्राहकांना घरपोच आंबे पोहोचवण्याची व्यवस्था व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. मागणी केल्यास एक पेटी ग्राहकांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बाजारात कलिंगड, खरबुजाची मोठी आवक

शहरात दोन दिवस टाळेबंदी लागू असल्याने मार्केट यार्ड दोन दिवस बंद होते. सोमवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. फळबाजारात कलिंगड, खरबुजाची मोठी आवक झाली. कलिंगड आणि खरबुजांना मागणीही चांगली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:14 am

Web Title: large supply of mangoes at shri chhatrapati shivaji market yard on the occasion of gudi padwa zws 70
Next Stories
1 जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेमडेसिविरसाठी देण्यात आलेले पत्ते, क्रमांक संपर्क  क्षेत्राच्या बाहेर
2 सायकलपटू प्रियंकाच्या चाकांना प्रोत्साहनाची गती
3 राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी
Just Now!
X