पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या प्रक्रियेतील पहिल्या फे रीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.

प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फे रीतील प्रवेशासाठी ३ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या फे रीत प्रवेश जाहीर झालेल्या ४०,०१३ विद्यार्थ्यांपैकी २२,४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर २५ ,००९ विद्यार्थ्यांनी प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन के ले आहे. प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याने प्रवेश जाहीर होऊन आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रवेश घेता येईल, अशी माहिती प्रवेश नियंत्रण समितीने दिली.

प्रवेश निश्चित करणे, प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणे

पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेसाठी लॉगीनमध्ये प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशनवर क्लिक करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महाविद्यालयात संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, प्रवेशपत्राची प्रत काढून ठेवावी. के वळ प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन के ल्यावर प्रवेश निश्चित होत नाही हे लक्षात ठेवावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट के ले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जायचे असल्यास किं वा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेता येईल. त्यासाठी व्ह्रिडॉवल ऑफ अ‍ॅडमिशनचा पर्याय संके तस्थळावर देण्यात आला आहे.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

’ रिक्त जागांची यादी : ४ सप्टेंबर

’ पसंतीक्रम नोंदवणे : ५ ते ७ सप्टेंबर

’ दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी : १० सप्टेंबर

’ प्रवेश निश्चिती : १० ते १२ सप्टेंबर