News Flash

लीला परूळेकर यांचे निधन

परूळेकर यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

ज्येष्ठ प्राणिप्रेमी लीला परुळेकर (वय ८१) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (दि. १३) सकाळी निधन झाले. लीला परूळेकर यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दैनिक सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या त्या कन्या होत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची देखभाल एक ट्रस्टमार्फत केली जात असत.
त्यांना प्राण्यांची खूप आवड होती. त्यांनी अनेक भटक्या कुत्र्यांची देखभाल त्यांच्या कोरेगाव पार्क येथील बंगल्यामध्ये केली होती. प्राणिप्रेमामुळे त्यांना महावीर जैन पुरस्कार तसेच विवेक मेनन अ‍ॅनिमल अलाईव्ह पुरस्कार देण्यात आला होता. पुण्यातील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 4:08 pm

Web Title: leela parulekar dies
Next Stories
1 तृप्ती देसाई करणार ‘ताईगिरी’ पथकाची स्थापना
2 ग्रामीण आरोग्यसेवेच्या विस्ताराचे उद्दिष्ट
3 मांजरआख्यान!
Just Now!
X