पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे बिबट्याचा वावर वाढला असून कळंब येथील परिसरात बुधवारी बिबट्याने पाच शेळ्यांना ठार केलं होतं. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मध्यरात्री याच ठिकाणी एका बिबट्याला जेरबंद करण्यात बिबट निवारण केंद्राला यश आलं आहे. बिबट्याचं वय अंदाजे दोन वर्षे असल्याचं सांगण्यात आलं.
परिसरात तीन बिबटे असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली होती. त्यानुसार एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. आंबेगाव, कळंब येथील धरणमळा परिसरात गेले महिनाभर तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. या परिसरातील शेळ्या, गायी, कुत्र्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले.
VIDEO: #Pune पुण्यात बिबट्याला जेरबंद करण्यात यशhttps://t.co/ZfyIjgJO7V pic.twitter.com/QEXKFwTktR
— LoksattaLive (@LoksattaLive) January 17, 2019
मारुती उर्फ बाबूंनाथ कहडने यांच्या पाच शेळ्या बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्या होत्या. वनविभागाने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून रात्री एकच्या सुमारास बिबट्याला पिजऱ्यात जेरबंद केले. पिंजऱ्यावर इतर दोन बिबट्यांनी रात्रभर ठाण मांडला होता अशी माहिती सुनीता कहडणे यांनी दिली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह (जुन्नर) येथील बिबटया निवारण केंद्रात रवानगी केली आहे. अजून दोन बिबट्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 1:58 pm