14 October 2019

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये बिबट्याचा वावर;नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!

सांगवी परिसरातील सीक्युएईमध्ये बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हिंजवडी च्या आयटी पार्क शेजारी असणाऱ्या कासारसाई इथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे देखील मिळाल्याच पाहायला मिळालं. ही घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड मधील सांगवी परिसरातील सीक्युएईमध्ये बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे. तसा दुजोरा सांगवी पोलिसांनी दिला आहे.

गेल्या काही महिन्यापासून बिबट्याची वाट शहराकडे वळताना दिसत आहे. आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कासारसाई परिसरात बिबट्या दिसला होता. त्याच्या पायाचे ठसे देखील सापडल्याचे स्थानिक सांगतात. ही घटना ताजी असताना पुण्याचे मध्यवरती ठिकाण असलेल्या सांगवी सीक्युएईमध्ये सोमवारी बिबट्या दिसल्याच सांगण्यात येत असून त्या संदर्भात पत्र काढण्यात आल आहे. सीक्युएईमध्ये लष्कर आणि संरक्षण विभागासाठी उपकरणे आणि रसायने बनवली जातात. सोमवारी मुळा नदी जवळ बिबट्या दिसल्याच नागरिकांचं म्हणणं आहे. परिसरात जंगल आणि इमारतीचा मोठा भाग आहे. दरम्यान, बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून खळबळ उडाली आहे. सीक्युएई प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवासी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुळा नदी लगत नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सांगवी पोलिसांकडून देखील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on May 16, 2019 12:16 am

Web Title: leopard in pimpri chinchwad