28 October 2020

News Flash

दगडूशेठ हलवाई गणपतीला २२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला २२१ मिष्ठान्नांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. एवढंच नाही तर सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजले होते. गणपती बाप्पाभोवती विविध प्रकारच्या फळांची आणि भाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मिठाई, फराळाचे तिखट आणि गोड पदार्थ या सगळ्यांना गणपतीचा अन्नकोट सजवण्यात आला.

एवढेच नाही तर कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांमुळे मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष आहे.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला. यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2018 9:07 pm

Web Title: lighting at dagdusheth halwai ganesh mandir for tripuri pournima
Next Stories
1 पिंपरीत वर्षभरात १४ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाल्याचा दावा
2 पुणे गोळीबार: जिगरबाज! वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे आरोपी तुरुंगात
3 राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा महापालिकेने बसवावा : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
Just Now!
X