News Flash

रखडलेले नाटय़संकुल अन् मंत्र्यांची आश्वासने

रंगभूमीला चालना मिळावी तसेच सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करता यावे, यासाठी शहरात नाटय़संकुल उभारण्याची कल्पना नाटय़ परिषदेचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर यांनी मांडली.

| August 12, 2013 02:40 am

रंगभूमीला चालना मिळावी तसेच सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करता यावे, यासाठी शहरात नाटय़संकुल उभारण्याची कल्पना नाटय़ परिषदेचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर यांनी मांडली. मात्र, मंत्र्यांकडून मिळणाऱ्या आश्वासनांमुळे ते कमालीचे वैतागले आहेत. काँग्रेसची सत्ता व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही मुहूर्त न मिळाल्याने आता भोईरांनी वनमंत्री पतंगराव कदम यांना साकडे घातले आहे. प्रश्न आपोआप सुटत नसतात, मुंबईला या, प्रश्न निकाली काढू, अशी ग्वाही पतंगरावांनी दिली आहे.
आकुर्डीतील २० गुंठे जागा भोईर यांना नाटय़संकुलासाठी हवी आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही यश मिळत नसल्याने ते वैतागले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. तीन वर्षांपूर्वी नाटय़ परिषदेच्या कार्यक्रमासाठी अजितदादा आले होते. तेव्हा १५ दिवसात नाटय़संकुलाचे भूमिपूजन होईल व पुढील कार्यक्रम संकुलात होईल, अशी घोषणा त्यांनी केली. तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांना तसे आदेशही दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले. मात्र, ती जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश देऊन अजितदादांनी काही प्रमाणात का होईना सकारात्मक भूमिका घेतली. तरीही हा विषय रेंगाळत पडला आहे. गुरुवारी चिंचवडला नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत भोईरांनी पतंगरावांचे या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधले. तेव्हा तीन दिवस मुंबईत असतो. तिकडे या, एकदाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नाटय़संकुलाच्या जागेचे पैसे देण्यासह अन्य नियम पाळण्याची तयारी आहे. तरीही विविध अडचणींचा पाढा सांगून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे. आता पतंगराव प्रश्न सोडवतील की मंत्र्यांच्या आश्वासनांचे सत्र कायम राहणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 2:40 am

Web Title: linger theatre and ministers promises
Next Stories
1 ‘विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे काम केव्हा पूर्ण होणार?’
2 तयार अन्नपदार्थाची सुरक्षितता वेष्टनावरूनच कळणार
3 जीवनाचा बोध प्राप्त करून देणारे ज्ञान हेच खरे ज्ञान – डॉ. विजय भटकर
Just Now!
X