News Flash

प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला विरोध

रहिवाशांच्या संमतीशिवाय रस्ता रुंदीकरण नाही; महापालिके ची भूमिका

रहिवाशांच्या संमतीशिवाय रस्ता रुंदीकरण नाही; महापालिके ची भूमिका

पुणे : प्रभात रस्ता आणि डेक्कन जिमखाना परिसराच्या गल्लीबोळातील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रूंद करण्यास स्थानिक रहिवाशांची संमती नसेल तर हा प्रस्ताव लादला जाणार नाही. जेव्हा भूखंडाचा पुनर्विकास करायचा असेल तेव्हाच या प्रस्तावाची अंलबजावणी के ली जाईल, असे आश्वासन महापालिके कडून देण्यात आले.

प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरातील अंतर्गत गल्लीबोळातील रस्ते ९ मीटर रुंद करण्याचे धोरण महापालिके ने स्वीकारले असून त्याबाबत स्थानिक रहिवाशांना महापालिके कडून नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १४ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध के ले होते. या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला बहुतांश नागरिकांचा विरोध आहे. यासंदर्भात डेक्कन जिमखाना कॉलनी पंचायतीने किशोर गोडबोले यांच्या पुढाकारातून महापालिके च्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.  स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे आणि स्वाती लोखंडे यावेळी उपस्थित होते. या बैठकीस उपस्थित असलेल्या १०० हून अधिक नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाबाबतचे आक्षेप महापालिका अधिकाऱ्यांपुढे नोंदविले. त्यामुळे विरोध असेल तर रस्ता रुंदीकरण के ले जाणार नाही, अशी भूमिका महापालिका अधिकाऱ्यांनी जाहीर के ली.

रहिवासी मार्गिका आणि गल्लीबोळातील रहदारीचे कोणतेही सर्वेक्षण महापालिके कडून करण्यात आले नव्हते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे, असे महापालिके चे अधिकारी कदम यांनी सांगितले.

गल्लीतून जाणाऱ्या रस्त्याला पुढे जोड रस्ता नसल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर संमतीशिवाय प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासनही कदम यांनी दिले. भूखंडाचा पुनर्विकास करायचा असेल तरच प्रस्तावित रस्ता प्रमाण रेषा नवीन इमारतीच्या आराखडय़ासाठी वापरली जाईल. सध्या या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिके कडे निधीची कमतरता आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.

रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला विरोध असणाऱ्या रहिवाशांनी २७ जानेवारी पूर्वी वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्या लेखी आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन किशोर गोडबोले यांनी के ले. पाणीपुरवठा, झाडे, वाहनतळ, क्लस्टर डेव्हलमेंट तसेच वाढीव एफएसआय याबाबतही अनेक नागरिकांनी या बैठकीत चिंता व्यक्त के ली. नोटिसा देताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. या निर्णयामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे, अशा तक्रारीही अनेकांनी व्यक्त के ल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 1:01 am

Web Title: local residents opposed to the proposed road widening work zws 70
Next Stories
1 तमिळनाडूमध्ये सर्वाधिक स्वायत्त महाविद्यालये
2 माजी विद्यार्थी कक्ष स्थापन करा
3 पुणे जिल्ह्य़ामध्ये प्रस्थापितांना धक्का
Just Now!
X