News Flash

पिंपरी-चिंचवडला आजपासून टाळेबंदी

सलग तीन दिवस सुरक्षित अंतराचे धोरण पायदळी

टाळेबंदी लागू होणार असल्याची घोषणा झाल्यापासून गेल्या तीन दिवसात शहरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.

सलग तीन दिवस सुरक्षित अंतराचे धोरण पायदळी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील टाळेबंदी १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ती कायम राहणार आहे. दहा दिवसांच्या या टाळेबंदीच्या घोषणेनंतर शहरवासियांनी गेल्या तीन दिवसात सगळीकडे मोठी झुंबड उडवून सुरक्षित अंतर धोरणाचे तीनतेरा वाजवले आहेत.

करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्यशासनाने २३ जुलैपर्यंत ही टाळेबंदी लागू केली आहे. त्यातील पहिले पाच दिवस कडक अंमलबजावणी होणार असल्याचे पालिका तसेच पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे, शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस मोठय़ा संख्येने नागरिक एकाच वेळी रस्त्यावर आले. सगळीकडे खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याचे धोरण कागदावरच राहिले. दरम्यान, टाळेबंदीच्या पूर्वसंध्येलाच पिंपरी पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. पोलिसांनी ठिकठिकाणी संचलन करत टाळेबंदीचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे दिला आहे.

यापूर्वीचे पास रद्द

पिंपरी पालिकेने यापूर्वी वितरित केलेले सर्व प्रकारच्या सवलतींचे पास रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने सोमवारी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यावश्यक सेवाअंतर्गत पाससाठी नव्याने पालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावे लागतील. तसेच, शहराबाहेरील पाससाठी पिंपरी पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज करावा लागेल. शासकीय आदेशांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालिका व पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:47 am

Web Title: lockdown in pimpri chinchwad city from today zws 70
Next Stories
1 सामान्यांची लूट; भाज्यांची चढय़ा भावाने विक्री
2 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आराखडय़ाकडे सरकारचे दुर्लक्ष
3 उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये निर्बंधांविरोधात संताप
Just Now!
X