News Flash

Lockdown: पोलिसांकडून कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकीन, साड्यांचे वाटप

लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या शेकडो महिला आणि नागरिकांना जेवण, धान्यही दिले

भोसरी : पोलिसांकडून कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकीन आणि साड्यांचे वाटप करण्यात आले.

औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. त्यामुळे इथं राज्यासह परराज्यातून शेकडो कामगार कामानिमित्त वास्तव्यास आहेत. यंदा करोनानं थैमान घातल्यानं शहरात लॉकडाउन झालं आणि त्यांचा रोजगार बुडाला. गावाकडंही जाता येत नसल्याने ते शहरातच अकडून पडले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कामगारांचाही समावेश आहे. अशा महिलांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस धाऊन आले आहे. या महिलांना एक वेळचं जेवण, सॅनिटरी नॅपकीन, साड्या आणि लहान मुलांसाठी बिस्किटं, कपडे आदी वस्तू देण्यात आल्या.

या महिलांना आपल्या मासिक धर्माचे पालन करताना शरिराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. मात्र, या लॉकडाउनच्या काळात त्यांची कुठलीही अडचण होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी महिलांना सॅनिटरी नॅपकीन देण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे शेकडो नॅपकिनचे महिलांना वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अधिकारी शंकर अवताडे, राजेंद्र कुंठे उपस्थित होते.

भोसरी पोलीस ठाणे आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक कंपन्या असून येथे परराज्यातून आलेले कामगार काम करतात. लॉकडाऊन झाल्यानंतर काही जणांनी इथून निघून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले आणि एका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली. कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये सर्वांचे कपडे राहिले. त्यामुळे त्यांची आणखीनच गैरसोय झाल्याने सर्वांच्या राहण्या-खाण्याची सोय सध्या पोलीस करत आहेत. रात्री उशिरा डीसीपी स्मिता पाटील यांच्या हस्ते महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन तर लहान मुलांना बिस्कीटांची पाकिटं वाटण्यात आली.

शहरात जिथं जिथं निवारा केंद्र आहेत तिथे संबंधित वस्तू वाटणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील एकही मजूर उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंटे यांनी म्हटले असून यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी त्यांच्या परिसरात तब्बल १० टन धान्य वाटप केले असून यात डाळ, गहू, तांदूळ, तेल यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:14 pm

Web Title: lockdown sanitary napkins and sarees allotted by police to working women at pimpri chinchwad aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा, धाड टाकून डीलरला अटक; ३९ लाखांच्या सिगारेट जप्त
2 तुम्ही सांगा फक्त कुठे आणि कधी? ‘त्या’ दोन मित्रांना पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय
3 भाजीपाल्याच्या उपबाजारांचे नियोजन
Just Now!
X