29 September 2020

News Flash

साखर उद्योगातील अडचणींवर उपायमंथन

‘लोकसत्ता’तर्फे सोमवारी पुण्यात साखर परिषद

‘लोकसत्ता’तर्फे सोमवारी पुण्यात साखर परिषद

पुणे : देशातील एकूण पाच कोटी ऊस उत्पादकांपैकी दीड कोटी उत्पादक शेतकरी एकटय़ा महाराष्ट्रातच असून त्यांच्यापुढे पाण्याच्या उपलब्धतेपासून अधिक पावसाच्या समस्या उभ्या आहेत. सुमारे एक कोटी मेट्रिकटन साखरेचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे सहकारी क्षेत्रातील अग्रेसर राज्य असले, तरीही साखर उद्योग सध्या खूपच अडचणीत आला आहे. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे येत्या सोमवारी, दि. २० रोजी पुण्यात साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची या परिषदेतील विशेष उपस्थिती या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

अतिरिक्त उत्पादनामुळे देशात साखरेची मागणी कमी होत आहे. साखर कारखानदारांनी साखरेबरोबरच  इथेनॉल आणि वीजनिर्मितीचेही प्रकल्प सुरू करून या उद्योगाला भरारी देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सरकारी धोरणे आणि प्रत्यक्ष कारखान्यावरील अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी ही परिषद कारखानदारांसाठी उपयोगी ठरणार आहे. शासनाने शेतकऱ्यांना उसाची रक्कम चौदा दिवसांत देण्यासाठी कायदा केला, मात्र साखरेच्या निर्मितीचा खर्च आणि विक्री यांचे आर्थिक गणित जुळवताना कारखान्यांची मोठीच पंचाईत होते. अशा परिस्थितीत राज्यातील साखर उद्योगाला नव्या विचारांनी पुढे जावे लागेल. यासाठी या साखर परिषदेत कारखानदारांना मार्गदर्शन होऊ शकेल. राज्याच्या विविध भागांतील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामुळे सर्वसमावेशक चर्चा घडून येण्यास मदत होणार आहे.

या साखर परिषदेत उपस्थित राहणाऱ्या कारखानदारांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार, राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदींची उपस्थिती असेल.

’टायटल पार्टनर : एस.एस. इंजिनीयर्स

असोसिएट पाटर्नर : रावेतकर, प्राज इंडस्ट्रीज लि. व मारुती सुझुकी – सुपर कॅरी

’पॉवर्ड बाय : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ जिल्हा कोल्हापूर, इंडियाना सुक्रो—टेक (पुणे) प्रा. लि.,  महाराष्ट्र राज्य साखर संघ लि., सुवीरॉन इक्विपमेंट्स प्रा. लि.,  भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., एक्सेल इंजिनीअरींग, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना लि. संगमनेर

’बँकिंग पार्टनर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 4:21 am

Web Title: lokasatta sugar conclave in pune on monday zws 70
Next Stories
1 ‘हायपरलूप’ प्रकल्पाला महाविकास आघाडीचा खोडा?
2 गोधडी नि घोंगडी जपू द्या की रं.!
3 डीएसके प्रकरणातील ठेवीदार ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या
Just Now!
X