लोकमान्य टिळकांनी राजकीय दृष्टिकोनातून मराठी भाषा घडविण्याचे काम केले, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी व्यक्त केले.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ या टिळकांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि इतिहासप्रेमी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात मोरे बोलत होते. या घोषणेचा दीपोत्सव करण्यात आला होता. इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे संचालक किरण शाळीग्राम, डॉ. सुनील भंडगे, रमणबाग प्रशालेचे मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे या वेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले,की महाराष्ट्रातील लोकांना मराठी भाषेमध्ये राजकीय विचार प्रकट करता यावेत, असे टिळकांचे मत होते. कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये अशी राजकीय भाषा टिळकांनी निर्माण केली.