देशातील तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. तिसर्‍या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून यंदा नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक व्यक्तिने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगामार्फत अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. पण आता असाच पुण्यातील कोथरूड येथील कडक मिसळकडून मतदानाची आकडेवारी वाढावी आणि सर्वांनी मतदानामध्ये सहभाग नोंदवावा. यासाठी मतदान केल्याचे दाखवा, एक मिसळवर एक मिसळ फ्री घ्या. अशी ऑफ़र मतदारसाठी देण्यात आली आहे. या ऑफ़रला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळाले.

कडक मिसळचे केतन तेंडले म्हणाले की, पुणे शहरात मिसळ खाणार्‍या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असून आमच्या इथे देखिल दररोज नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हे पाहून निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाने मतदान करावे. यासाठी आम्ही एका मिसळवर एक मिसळ फ्री अशी ऑफर आम्ही मतदारांना दिली आहे. मात्र त्यामध्ये दोघांनी देखील मतदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.