लोकसत्ता ‘अर्थब्रह्म’चे आज पुण्यात प्रकाशन
आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या ‘लोकसत्ता’च्या अर्थब्रह्म या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी (१० मे) होणार आहे. त्यानिमित्ताने पुणेकरांना तज्ज्ञांचा गुंतवणुकीचा सल्ला मिळणार असून, गुंतवणुकीविषयी विविध शंकांचे निरसन करून घेण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
रिजेन्सी ग्रुप प्रस्तुत, बीएनपी पारिबास म्युच्युअल फंड यांचे सहप्रायोजकत्व (पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी आणि नातू परांजपे) असलेला हा उपक्रम कोथरूडच्या मयूर कॉलनीमधील बालशिक्षण मंदिरातील एम. ई. एस. सभागृहात संध्याकाळी पावणेसहाला होणार आहे. आर्थिक नियोजन कसे करावे, गुंतवणूक कशी करावी, किती व केव्हा करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात पुणेकरांना मिळणार आहेत. ‘आर्थिक नियोजनाचे महत्त्व’ या विषयावर अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर चितळे हे मार्गदर्शन करतील. ‘कर नियोजनातून संपत्ती निर्माण’बाबत माधव गणपुले, तर ‘म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार’ हा विषय उज्ज्वल मराठे उलगडून सांगणार आहेत.
कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे, मात्र प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्धा तास अगोदर मिळतील. काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

’कधी : मंगळवार, १० मे २०१६
’वेळ : सायं. ५.४५ वाजता
’स्थळ : एम. ई. एस. सभागृह, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड.
’सहभाग : चंद्रशेखर चितळे,
माधव गणपुले आणि उज्ज्वला मराठे