‘अगदीच बच्चू’ ब्लॉगबेंचर्स विषयावरील विजेत्यांच्या भावना
‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’मुळे विचार करण्याची सवय लागली. अधिकाधिक चांगले लिहिण्याचे, आपली लेखनपरंपरा पुढे नेण्याचे स्वप्न आहे,’ अशा भावना विजेत्यांनी व्यक्त केल्या. ‘अगदीच बच्चू’ या अग्रलेखावरील स्पर्धेत फर्गसन महाविद्यालयातील चित्ततोष खांडेकर याने प्रथम क्रमांक, तर शिवकुमार चन्नगिरे याने द्वितीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते विजेत्यांना बुधवारी पारितोषिक देण्यात आले.
मूळचा अकोले येथील चित्ततोष हा ‘स्टॅटिस्टिक’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘‘मी ‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेतही पारितोषिक मिळवले आहे. आपल्याकडे लेखनाची मोठी परंपरा आहे. मात्र चांगले लेखन होत नसल्याची तक्रारही सातत्याने केली जाते. ‘लोकसत्ता’मुळे मला लिहिण्याची संधी मिळाली. यापूर्वी नुसतेच बोलण्यापलीकडे जाऊन मांडणे हेदेखील मी ‘लोकसत्ता’च्या स्पर्धेतूनच शिकलो,’’ अशा भावना चित्ततोष याने व्यक्त केल्या. शिवकुमार हा मूळचा लातूर येथील असून मराठी विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. या वेळी शिवकुमार म्हणाला, ‘‘मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे. आतापर्यंत त्या निमित्ताने जे काही वाचले त्याचा लिहिताना उपयोग झाला. बक्षिसाच्या स्वरूपात मिळालेले आर्थिक पाठबळही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. मला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मी अधिक चांगले वाचण्यासाठी, अधिक पुस्तके घेण्यासाठी वापरणार आहे.’’
या वेळी डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असते. ‘लोकसत्ता’ही त्यादृष्टीने विविध उपक्रम आयोजित करत असते. प्र. के. अत्रे, राम गणेश गडकरी, इंदिरा संत यांसारखे अनेक साहित्यिक हे फर्गसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आजचे दोन्ही विजेते हे महाविद्यालयाचे आहेत याचा अभिमान आहेच, मात्र लेखनाची ही परंपरा अधिक सशक्तपणे वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?