पुणे : पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद येथील खास प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांना यंदाचा वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मंडळातर्फे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी यांना वरुणराज भिडे पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर सरदेशमुख यांच्यासह ‘दिव्य मराठी’च्या वरिष्ठ बातमीदार जयश्री बोकील आणि ‘न्यूज १८ लोकमत’ वृत्तवाहिनीचे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ मे रोजी एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमात ‘चालू घडामोडी’ या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती वरुणराज भिडे मित्रमंडळाचे प्रा. विलास जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. प्रकाश भोंडे, चारुचंद्र भिडे आणि जयराम देसाई या वेळी उपस्थित होते.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान