28 February 2021

News Flash

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्वद लाखांचे सोने जप्त

आखाती देशातून तस्करी करणारी महिला अटकेत

आखाती देशातून तस्करी करणारी महिला अटकेत

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून आलेल्या महिलेकडून सीमा शुल्क विभागाने नव्वद लाखांचे सोने जप्त केले. महिलेने प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याची भुक टी ठेवली होती. तस्करी करणाऱ्या महिलेला सीमा शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

डॅनटसा ज्युनेका जॉन असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. जॉन रविवारी सकाळी दुबईहून आलेल्या विमानाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळाच्या आवारातून घाईने जात असलेल्या जॉनला सीमा शुल्क विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी टिपले. संशय आल्याने तिची चौकशी सुरु करण्यात आली. तिच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. जॉनची स्कॅनिंग यंत्रणेच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली, तेव्हा तिने कमरेच्या पट्टयात प्लास्टिकच्या चार छोटय़ा पिशव्या लपवल्याचे दिसले. पिशवीत सोन्याची भुकुटी होती. या पिशव्यांमधील २ किलो ७९१ गॅ्रम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ९० लाख ४४ हजार रुपये आहे. जॉनविरोधात सीमा शुल्क कायद्यानुसार (कस्टम अ‍ॅक्ट)  कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त के. रामाराव , हर्षल मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भगवान शिंदे, एस. एस. खैरे, एस.व्ही. झरेकर, सतिश सांगळे, निरीक्षक संगीता बाळी, सुषमा जाधव, राजेंद्र मीना, एस. एस. निंबाळकर आदींनी ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 4:19 am

Web Title: loksatta crime news 156
Next Stories
1 पर्यायांच्या चाचपणीनंतरच कर्वे रस्त्यावर चक्राकार वाहतूक
2 ‘वरवरा राव यांनी मणिपूर, नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट रचला’
3 भारताची राज्यघटना आता ‘ब्रेल लिपी’त
Just Now!
X