सुनेचा शारिरिक, मानसिक छळ केल्याच्या आरोपावरुन माजी आमदार बापू पठारे, त्यांचा मुलगा, सासु यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बापू पठारे, त्यांचा मुलगा रवींद्र, सासु संजीला, दीर सुरेंद्र, नणंद दीपाली गव्हाणे, मारुती बेलदरे, शारदा बेलदरे यांच्या विरोधात शारिरिक तसेच मानसिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विवाहानंतर सासु, सासरे आणि नातेवाईकांनी माझा शारिरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप पठारे यांच्या सुनेने फिर्यादीत केला आहे. बापू पठारे यांनी सुनेकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात सुनेने कोणाच्या तरी सांगण्यावरुन संपूर्ण कुटुंबाला गोवले आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 10:58 pm