पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाबरोबरच ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’चीही तयारी सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयातून प्रवेश अर्ज नेले असून स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच अनेक सोसायटय़ांची गणेश मंडळेही स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि सोसायटय़ांमधील मंडळांचीही तयारी सुरू झाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच पुण्यातील सोसायटय़ांमधील मंडळेही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे अनेक सोसायटय़ांनीही स्पर्धेत सहभागासाठीचे प्रवेश अर्ज नेले आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाची तयारी गणेश मंडळांमध्ये सुरू झाली आहे. ठिकठिकाणी उत्सवाचे मंडप उभे राहत आहेत. ही तयारीची धामधूम सुरू असतानाच सार्वजनिक मंडळांचे देखावे अधिक प्रेक्षणीय व्हावेत, त्यातून देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या लाखो लोकांचे प्रबोधन व्हावे आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने यंदा गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे.

‘पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१८’ चे सहप्रायोजक फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स हे आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुण्यातील सोसायटय़ा अशा तीन गटांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत विजेत्या मंडळांना भरघोस रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा सविस्तर तपशील आणि प्रवेश अर्ज व अन्य माहितीसाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयात संपर्क साधावा.

सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. घरोघरच्या गणपतीची सजावट करण्याची तयारी सुरू असतानाच कार्यकर्ते मंडळांच्या मंडपामध्ये नियोजन करताना दिसत आहेत. एरवी कामाच्या निमित्ताने व्यग्र असलेली सोसायटीमधील मंडळी गणेशोत्सवाच्या तयारीनिमित्ताने एकत्र येऊन देखाव्याची सजावट करण्यासाठी झटत आहेत. साऱ्यांना आता गणरंगी रंगून जाण्यासाठी केवळ चार दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१८

  • सहप्रायोजक : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि., पु. ना. गाडगीळ आणि सन्स
  • पॉवर्ड बाय : मँगो हॉलिडेज, बी. जी. चितळे, मांडके हिअिरग सव्‍‌र्हिसेस, प्रकाश कोल्हापुरी मसाले, इझी ड्राय सिस्टिम्स, शतानिया प्लस
  • बँकिंग पार्टनर : बुलडाणा अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

स्पर्धेची अधिक माहिती आणि प्रवेश अर्जासाठी संपर्क :अमोल गाडगीळ, ‘लोकसत्ता’ कार्यालय, एक्सप्रेस हाउस, प्लॉट नं. १२०५/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४. दूरभाष- (०२०) ६७२४१००० किंवा ९८८१२५६०८२ (दुपारी १२ ते सायंकाळी ५ )