लोकसत्ता लोकांकिकास्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी जल्लोषात

आपल्या महाविद्यालयाची एकांकिका सुरू झाली की सरसावून बसणारे विद्यार्थी.. त्याचवेळी सेट.. रेडी, लाईट्स.. रेडी, साऊंड.. रेडी.. अशी पडद्यामागे चाललेली लगबग.. अशा सगळ्या उत्साही वातावरणात आणि तरुणाईच्या जल्लोषात स. प. महाविद्यालयाचा ‘आव्वाज’ बुधवारी घुमला. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत स. प. महाविद्यालयाच्या ‘३०० मिसिंग’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिकासह महाअंतिम फेरी गाठली. या फेरीत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ‘नेकी’ या एकांकिकेने द्वितीय आणि सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘पाहुणा’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
Central Board of Secondary Education
नोकरीची संधी: ‘सीबीएसई’मधील संधी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सुरू झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीतील  चुरस बुधवारी रंगली. दिग्दर्शन, लेखन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना अशा वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स. प. महाविद्यालयाच्या ‘३०० मिसिंग’ या एकांकिकेने पटकावले. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ‘नेकी’ या एकांकिकेने, तर सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘पाहुणा’ या एकांकिकेने पटकावले.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत राज्यभरातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवित आणि प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी या फेरीचे परीक्षण केले. प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून आलेल्या सवरेत्कृष्ट चार एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर झाल्या. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा होत असून ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ टॅलेंट पार्टनर आहेत. ‘झी युवा’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’, ‘केसरी’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत.

untitled-3