तरुणाईचा आविष्कार, उत्साह, कल्पकता आणि जल्लोष अनुभवण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना मिळणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी रविवारी (७ डिसेंबर) होणार असून पुण्यातील महाविद्यालयांच्या सवरेत्कृष्ट पाच एकांकिका या वेळी पाहता येणार आहेत. या स्पर्धेच्या मोफत प्रवेशिका लोकसत्ताच्या कार्यालयात शनिवारी मिळणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी रविवारी (७ डिसेंबर) होणार आहे. चुरशीच्या प्राथमिक फेरीतून पुण्यातील पाच सवरेत्कृष्ट एकांकिकांची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या फेरीत गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘रूह हमारी’, स. प. महाविद्यालयाची ‘विल ऑफ द विशेस’, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘मोटीव्ह’, आयएलएस विधी महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची ‘फोटू’ या एकांकिका पाहता येणार आहेत.
भरत नाटय़मंदिर येथे रविवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून या जल्लोषाची सुरुवात होणार आहे. या जल्लोषात सहभागी होण्याची संधी वाचकांना मिळणार असून स्पर्धेच्या मोफत प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात उपलब्ध आहेत. एका प्रवेशिकेवर एका व्यक्तीला प्रवेश देण्यात येईल. ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून मिळणार आहेत. प्रवेशिका उपलब्ध असेपर्यंत मिळतील.
अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ची साथ मिळाली आहे. त्याचप्रमाणे केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ऑइल यांचाही स्पर्धेच्या आयोजनात मोठा वाटा आहे.
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण- ‘लोकसत्ता’, एक्सप्रेस हाउस, १२०५/०२/०६, शिरोळे रस्ता, (बँक ऑफ इंडियाजवळ), संभाजी उद्यानासमोर, शिवाजीनगर, पुणे.