उत्साहवर्धक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची पुणे विभागीय फेरी रविवारी पार पडली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत आयएलएस विधी महाविद्यालायाच्या ‘चिठ्ठी’ या एकांकिकेने बाजी मारत महाअंतिम फेरीत दाखल होणाऱ्या पहिल्या एकांकिकेचा मान पटकावला.
पुणे विभागाची अंतिम फेरी रविवारी पार पडली. प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून आलेल्या सवरेत्कृष्ट पाच एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर झाल्या.  मात्र, अखेर आयएलएस विधी महाविद्यालयाच्या ‘चिठ्ठी’नेच बाजी मारली. सांघिक प्रथक क्रमांकाचे पारितोषिक पटकावतानाच दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत अशा वैयक्तिक पारितोषिकांवरही ‘चिठ्ठी’नेच वर्चस्व राखले. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘फोटू’ या एकांकिकेला, तर तृतीय पारितोषिक गरवारे वाणिज्यच्या ‘रूह हमारी’ला मिळाले.

वैयक्तिक पारितोषिक विजेते
*सवरेत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
*सवरेत्कृष्ट अभिनय- अर्पिता घोगरदरे, ज्ञानरत्न अहिवळे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
*सवरेत्कृष्ट नेपथ्य- आदेश सारभुकण, रेणुका जोशी, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
*प्रकाश योजना- आनंद थोटांगे, शीतल मेनन, नृपाल डिंगणकर, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
*संगीत दिग्दर्शन- विनित प्रभुणे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)