विद्यार्थ्यांच्या उत्साहात ‘लोकांकिका’ची प्राथमिक फेरी संपन्न

दमदार प्रयोग करण्यासाठीची लगबग.. थोडेसे दडपण आणि भरपूर उत्साह.. अशा वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय प्राथमिक फेरीचा दुसरा दिवस पार पडला. विभागीय अंतिम फेरीसाठी पाच महाविद्यालयांच्या एकांकिका निवडण्यात आल्या असून, आता विभागीय अंतिम फेरीची उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या दिवशीच्या एकांकिका विद्यार्थ्यांच्या उत्साही वातावरणात सादर झाल्या. गेल्या दीड महिन्यापासून महाविद्यालयांमध्ये लोकांकिकासाठी तालमी सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येक एकांकिकेसाठी विद्यार्थ्यांनी विषयाची निवड, विषयाची नेमकी आणि प्रभावी मांडणी, अभिनय, नेपथ्यनिर्मिती, वेशभूषा अशा सर्वच घटकांवर मेहनत घेतल्याचे दिसून येत होते. सादरीकरणापूर्वी एकमेकांना शुभेच्छा आणि सादरीकरण झाल्यावर एकमेकांचे कौतुक करतानाच काय चुका झाल्या, याची चर्चाही रंगकर्मीमध्ये होती.

प्राथमिक फेरीत जेधे महाविद्यालय (अमन), काशीबाई नवले महाविद्यालय (हुमल्या), टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (तुज आहे लॉजपाशी), स. प. महाविद्यालय (ऐनावरम), मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (कन्सेप्ट), फग्र्युसन महाविद्यालय (टिळा), बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (कुणीतरी पहिलं हवं), रत्नाई महाविद्यालय (जागर), पीव्हीपीआयटी (मन्टो), एमआयटी विश्वशांती विद्यापीठ (आयरनीच्या देवा), काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (टॅन्जन्ट), मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य                    (पान ५ वर)

आता उत्सुकता विभागीय अंतिम फेरीची!

महाविद्यालय (तमाशा), एम. एम. जोशी महाविद्यालय (गोत्या), मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर (अवलिया), गरवारे वाणिज्य महाविद्यालय (तिकीट) अशा वैविध्यपूर्ण एकांकिका सादर झाल्या. मनोरुग्णांना मतदानाचा अधिकार मिळणे, हिंदू-मुस्लिम एकात्मका, भौतिक सुखांपायी नात्यांमध्ये पडणारे अंतर अशा विषयांची मांडणी या एकांकिकांमधून करण्यात आली.

प्राथमिक फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेल्या पाच एकांकिका १३ डिसेंबरला भरत नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सादर होतील. त्यातून सवरेत्कृष्ट एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता महाअंतिम फेरीचे लक्ष्य ठेवूनच पुढील काही दिवस विद्यार्थी तयारी करणार आहेत.

 

११११११११ ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि एम. के. घारे ज्वेलर्स हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे.

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका

  • फग्र्युसन महाविद्यालय (टिळा)
  •   मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (कन्सेप्ट)
  •  स. प. महाविद्यालय (ऐनावरम)
  •   बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (कुणीतरी पहिलं हवं)
  •   काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (टॅन्जंट)