News Flash

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मधून वेगळ्या वाटांचा शोध

बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येईल, तर शुक्रवारपासून प्रवेशिका उपलब्ध होतील.

  • करिअरसंबंधी मार्गदर्शनासाठी पुण्यात कार्यशाळा
  • ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू

वैद्यकीय, अभियांत्रिकी या पलीकडेही अनेक क्षेत्रांना गुणवान मनुष्यबळाची गरज आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती मिळवण्याची आणि त्यातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दहावी- बारावीनंतरच्या वाटचालीचा मार्ग निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. २५ आणि २६ मे रोजी ही कार्यशाळा ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे. बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येईल, तर शुक्रवारपासून प्रवेशिका उपलब्ध होतील.

वर्षांनुवर्षे विद्यार्थ्यांचा ओढा असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांबरोबरच कला, खेळ, वेगवेगळी कौशल्ये यांतील मनुष्यबळाची गरज उद्योगांना भासते आहे. समाज माध्यमांच्या वाढलेल्या वापरामुळे त्याचा जाहिरातीसाठी वापर करण्याचे कौशल्य, चांगल्या आवाजाच्या शोधात असलेली डबिंग, व्हॉईस-ओव्हर, रेडिओ जॉकी यांसारख्या अनेक वेगळ्या वाटा सध्या गुणवान उमेदवारांना खुणावत आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख या कार्यशाळेतून होणार आहे. मात्र असलेल्या असंख्य पर्यायांमधील आपल्यासाठी नेमका योग्य पर्याय कोणता, तो कसा निवडायचा, त्यासाठी काय तयारी करायची, नेमके करिअर करायचे म्हणजे काय करायचे यावरही तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षा झाल्या आहेत. त्याच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आता उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रांत जाऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील वर्षांच्या प्रवेश परीक्षेची तयारीही सुरू केली असेल. त्यांना या परीक्षा कशा द्यायच्या, प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करिअरची वाट निवडताना आणि स्पर्धेत धावताना येणारे खाचखळगे, ताण याला सामोरे कसे जायचे यावर मानसोपचार तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येईल.

ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असणार आहेत. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आजपासून (१७ मे) ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकेल, किंवा ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात शुक्रवारपासून (१९ मे) प्रवेशिका मिळू शकतील.

महत्त्वाचे काही

  • कार्यशाळा कधी होणार – २५ आणि २६ मे
  • कुठे होणार – हॉटेल सेंट्रल पार्क, बापुसाहेब गुप्ते मार्ग, शिवाजीनगर
  • कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
  • प्रवेशिका शुल्क – एका दिवसाचे ३० रुपये (दोन्ही दिवस वक्ते आणि विषय सारखे असतील)
  • प्रवेशिका कुठे मिळतील – ‘लोकसत्ता’, एक्सप्रेस हाऊस, १२०५ / ०२ /०६, शिरोळे रस्ता, (संभाजी बागेसमोरील गल्ली), शिवाजीनगर
  • कधी मिळतील – शुक्रवारपासून (१९ मे)
  • आजपासून नोंदणी ऑनलाईनही करता येऊ शकेल.
  •  ऑनलाईन नोंदणीसाठी – https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-pune-133304

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी’.  ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:01 am

Web Title: loksatta marg yashacha pune
Next Stories
1 शहरबात पिंपरी-चिंचवड : हेवेदावे, नव्या-जुन्यांचा संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर..
2 पंधरा दिवसांत मान्सून भारतात
3 दलित चळवळीतील तारा निखळला : रामदास आठवले
Just Now!
X