News Flash

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या प्रवेशिका आजपासून उपलब्ध होणार

ही कार्यशाळा २५ आणि २६ मे रोजी ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या प्रवेशिका आजपासून उपलब्ध होणार

यशाचा मार्ग चोखळण्यासाठी मागर्दशन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका शुक्रवारपासून (१९ मे) उपलब्ध होणार असून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेशिका मिळू शकतील. ही कार्यशाळा २५ आणि २६ मे रोजी ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे.

या कार्यशाळेत करीअर करायचे म्हणजे नेमके काय करायचे? आपल्याला योग्य असा अभ्यासक्रम कसा निवडायचा? याबाबत प्रसिद्ध करीअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. एखादा विषय न आवडणे, परीक्षेत अपयश येणे यांमुळे निराशा येते. त्याचा परिणाम पुढील आयुष्यावर आणि करीअरवर होत असतो. अपयश किंवा ताणाशी सामना कसा करायचा याचा कानमंत्र प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार देणार आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा असणाऱ्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षांची तयारी यांबाबत डॉ. अभय अभ्यंकर, डॉ. अतुल ढाकणे संवाद साधणार आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक, तंत्रज्ञान या करीअरच्या वाटा यशाकडे नेणाऱ्या आहेतच; मात्र त्या पलीकडेही अनेक नवे पर्याय समोर येत आहेत. वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींच्या निर्मितीमागील कसरत, या क्षेत्रातील करीअरचे पर्याय, समाज माध्यमांच्या वाढलेल्या प्रभावाचा करीअरसाठी कसा वापर करून घेता येईल याबाबत एका नामवंत जाहिरात संस्थेचे संचालक ऋग्वेद देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. चांगला आवाज ही देखील चांगल्या करीअरची वाट असू शकते. चांगल्या आवाजाच्या शोधात असणारी निवेदन, डबिंग, व्हॉइसओव्हर, रेडिओ जॉकी यांसारखे पर्याय प्रसिद्ध निवेदक डॉ. अमित त्रिभुवन उलगडून दाखवतील. खेळाडू म्हणून आपले स्थान निर्माण करण्यापलीकडे क्रीडाक्षेत्रात संघाचे, सामन्यांचे व्यवस्थापन, आहारतज्ज्ञ, पंच किंवा रेफ्री असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यावर क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे प्रकाश टाकणार आहेत.

ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असणार आहेत. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात शुक्रवारपासून (१९ मे) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळू शकतील. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही सुरू झाली आहे.

महत्त्वाचे काही

  • कार्यशाळा कधी होणार – २५ आणि २६ मे
  • कुठे होणार – हॉटेल सेंट्रल पार्क, बापूसाहेब गुप्ते मार्ग, (जंगलीमहाराज रस्त्याजवळ) शिवाजीनगर
  • कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
  • प्रवेशिका शुल्क – एका दिवसाचे ३० रुपये (दोन्ही दिवस वक्ते आणि विषय सारखे असतील)
  • प्रवेशिका कुठे मिळतील – ‘लोकसत्ता’, एक्सप्रेस हाऊस, १२०५ / ०२ /०६, शिरोळे रस्ता, (संभाजी बागेसमोरील गल्ली), शिवाजीनगर
  • वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

ऑनलाईन नोंदणीसाठी – https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-pune-133304

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी’. ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 4:04 am

Web Title: loksatta marg yashacha pune 3
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाची ओढ आणि शोध भावनेतून शिल्पप्रकाश उजळला
2 पुण्यात देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
3 सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयास प्राधान्य द्या, पुणे महापौरांचे मुख्यमंत्र्याना पत्र
Just Now!
X