News Flash

पुण्यात आज आणि उद्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असतील

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तुकाराम मुंढे यांच्या हस्ते उद्घाटन

आपल्याला योग्य अशा करिअरची किंवा क्षेत्राची निवड करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा गुरुवार (२५ मे) आणि शुक्रवारी (२६ मे) होत आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी मिळू शकतील. शिवाजीनगर येथील ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ मध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.

बारावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे (२५ मे) उद्घाटन पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन सत्र होईल. त्यानंतर करिअर समुपदेशक विवेक वेलणकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार, डॉ. अभय अभ्यंकर, डॉ. अतुल ढाकणे, नामवंत जाहिरात संस्थेचे संचालक ऋग्वेद देशपांडे, निवेदक डॉ. अमित त्रिभुवन, क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असतील. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून प्रवेशिका कार्यक्रमस्थळी म्हणजे हॉटेल सेंट्रल पार्क येथे सकाळी ९ वाजल्यापासून मिळू शकतील.

महत्त्वाचे काही

* कार्यशाळा कधी होणार – २५ आणि २६ मे, सकाळी ९ ते सायंकाळी ५

* कुठे होणार – हॉटेल सेंट्रल पार्क, बापूसाहेब गुप्ते मार्ग, (जंगलीमहाराज रस्त्याजवळ) शिवाजीनगर

* प्रवेशिका शुल्क – एका दिवसाचे ३० रुपये (दोन्ही दिवस वक्ते आणि विषय सारखे असतील)

* प्रवेशिका कुठे मिळतील- कार्यक्रमस्थळी मिळू शकतील.

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी, ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:55 am

Web Title: loksatta marg yashacha workshop inugration by tukaram mundhe
Next Stories
1 कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मुंबई पोलिसांचा छापा
2 परस्पर घोषणा होत असल्याने पिंपरीच्या महापौरांची नाराजी
3 पुण्यातील १५ हजार आयटी कर्मचाऱ्यांना कपातीची धास्ती
Just Now!
X