ज्येष्ठ संगीतकार इलाय राजा, ऑस्करप्राप्त ए. आर. रेहमान यांच्यासह काम करण्याचा अनुभव, हिंदी-मराठी चित्रपटांतील अनेक लोकप्रिय गाण्यांमागील गोष्टी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका बेला शेंडे यांच्याकडून आज ऐकता येणार आहेत. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद रंगणार आहे.

शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कु टुंबातील बेला यांनी स्वत:ची वेगळी वाट शोधली. गोड आवाजाच्या जोरावर स्वत:ची अल्पावधीत ओळख निर्माण के ली. मराठी म्युझिक अल्बम, दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, मराठी-हिंदी चित्रपटांतील अनेक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या गायनाचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही झाला आहे. त्यामुळेच बेला शेंडे हे नाव आज पार्श्वगायन क्षेत्रात आघाडीवर आहे. बेला यांचा सांगीतिक प्रवास प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री उलगडतील.  विनोदाची उत्तम जाण असलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. बेला आणि पुष्कर यांच्यातील गप्पांची मैफल रंगणार आहे.

वेब संवादात सहभागी होण्यासाठी इतकेच करा

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_5June या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

* नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल.

* या द्वारे ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.

* https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.