अवीट गोडीची भावगीते, भक्तिरसाने भरलेली भक्तिगीते, जाहिरातींची अनोखी दुनिया, नाटक आणि चित्रपटांचे संगीत अशा विविध प्रांतांमध्ये मुशाफिरी करणारे संगीतकार अशोक पत्की हे शुक्रवारी (१२ जून) ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात सहभागी होत आहेत. सुगम संगीतातील पाच दशकांची सुरेल वाटचाल त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून उलगडेल. सायंकाळी ५  वाजता हा वेबसंवाद रंगणार आहे.

दूरचित्रवाणीवरील मालिकांची शीर्षकगीते, नाटक-चित्रपट क्षेत्रांतील अनमोल कारकीर्दीसह जाहिरातीच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून पत्की यांनी केलेले काम समजून घेण्याचीही संधी या वेबसंवादाच्या माध्यमातून मिळणार आहे.

सहभागी होण्यासाठी..

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_12June या लिंकवर जाऊन नोंदणी करा. नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता या वेबसंवादात सहभागी होता येईल.