15 July 2020

News Flash

गायिका बेला शेंडे यांच्याशी उद्या सांगितिक संवाद

शुक्रवारी (५ जून) सायंकाळी पाच वाजता हा वेब संवाद रंगणार आहे.

संग्रहित छायाचित्र

नटरंग चित्रपटातील ‘वाजले की बारा’सारख्या लोकप्रिय लावणीपासून ते जोधा अकबर चित्रपटातील मन मोहना या हळुवार गाण्यांपर्यंत वेगवेगळ्या धाटणीची गाणी लीलया गाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका बेला शेंडे यांच्याशी सहज संवादाची संधी मिळणार आहे. लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात शुक्रवारी (५ जून) सायंकाळी पाच वाजता हा वेब संवाद रंगणार आहे.

शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर बेला यांनी दूरचित्रवाणी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यानंतर म्युझिक अल्बम, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीतांतून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांना अनेक संगीतकारांसह काम करण्याची संधी मिळाली. संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास या वेब संवादातून उलगडेल.

बेला यांच्या संगीत क्षेत्रातील वाटचालीबद्दल अभिनेते पुष्कर श्रोत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दूरचित्रवाणी, चित्रपट, नाटय़ क्षेत्रात पुष्कर  गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. सूर्याची पिल्ले, परफे क्ट मर्डर, हसवाफसवी अशी व्यावसायिक नाटके , चित्रपटांतील अभिनयासह उबुंटू या चित्रपटाचे दिग्दर्शनही  केले आहे. विनोदाची उत्तम जाण असलेल्या या अभिनेत्याने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केले आहे. बेला आणि पुष्कर यांच्यातील संवाद  खुमासदार होईल यात शंका नाही.

वेब संवादात सहभागी होण्यासाठी इतकेच करा

https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_5June या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

* नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल.

* या द्वारे ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.

* https://www.loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

लोकसत्ता ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सहप्रायोजक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 12:11 am

Web Title: loksatta sahaj bolta bolta with singer bella shende tomorrow abn 97
Next Stories
1 चिंताजनक : पुण्यात एकाच दिवसात २९४ रुग्ण आढळले
2 सोलापूरच्या उपमहापौरांना सोडणारे पोलीस अधिकारी निलंबित
3 निसर्ग चक्रीवादळाचे पुण्यातही पडसाद उमटण्याची भीती, पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
Just Now!
X