‘लोकसत्ता’तर्फे पुण्यात साखर परिषद

पुणे : चाळीस हजार कोटींची उलाढाल असलेल्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाला उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढत चालल्याने कर्जाच्या विळख्यात अडकावे लागत आहे. अशा स्थितीत या उद्योगाला नवसंजीवनी कशी प्राप्त करून घेता येईल, या आणि अशा अनेक मुद्दय़ांबद्दलचे विचारमंथन करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे येत्या सोमवारी, दि. २० जानेवारी रोजी पुण्यात साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या परिषदेसाठी खास उपस्थित राहणार आहेत.

साखर उद्योगाने सुरू केलेल्या इथेनॉलनिर्मितीस चालना मिळाल्यास, परकीय चलन वाचण्यास मदत होईल हे लक्षात घेऊन येत्या तीन वर्षांत देशाची गरज पुरेल, एवढे इथेनॉल तयार करण्यासाठी या उद्योगाने पुढाकार घेतला आहे. पेट्रोलमध्ये ते मिसळण्याचे सरकारी धोरण पुन्हा अमलात आणणे त्यासाठी आवश्यक आहे. उसापासून साखरनिर्मितीला बीटसारखे पर्यायही सध्या उभे राहू लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील साखर उद्योगाला नव्या विचारांनी पुढे जावे लागेल. यासाठी या साखर परिषदेत कारखानदारांना मार्गदर्शन होऊ शकेल. राज्याच्या विविध भागांतील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामुळे सर्वसमावेशक चर्चा घडून येण्यास मदत होणार आहे.

  • टायटल पार्टनर : एस.एस. इंजिनीयर्स
  • असोसिएट पाटर्नर : रावेतकर, प्राज इंडस्ट्रीज लि. व मारुती सुझुकी – सुपर कॅरी
  • पॉवर्ड बाय : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ जिल्हा कोल्हापूर, इंडियाना सुक्रो—टेक (पुणे) प्रा. लि.,  महाराष्ट्र राज्य साखर संघ लि., सुवीरॉन इक्विपमेंट्स प्रा. लि.,  भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., एक्सेल इंजिनीअरींग, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना लि. संगमनेर
  • बँकिंग पार्टनर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित