आपल्या बुद्धीच्या, कल्पनांच्या, प्रयोगशीलतेच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान युवकांचा गौरव करणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार सोहळा लवकरच रंगणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत या तरुण तेजांकितांना सन्मानित करण्यात येईल.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळ्याच्या आतापर्यंतच्या दोन पर्वांना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी हा सोहळा होऊ शकला नाही. पण करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून लवकरच हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्यांची कार्यक्रमात घोषणा…

संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यमी, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा आणि सुशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय काम के लेल्या युवकांची ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’साठी निवड करण्यात आली आहे. तरुण तेजांकित ठरलेले हे युवक कोण हे कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रायोजक : सोहळ्याचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सहप्रायोजक सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पॉवर्ड बाय एम. के. घारे ज्वेलर्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा यांच्या सहकार्याने हा सोहळा होणार आहे.