News Flash

लोणावळा शहरात २४ तासांत ८१ मिमी पावसाची नोंद

गत वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी

लोणावळा शहरात मागील २४  तासात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गत वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी २४ तासात ३८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षी लोणावळा शहर आणि परिसरात अत्यल्प पाऊस असल्याचं चित्र आहे. याचा थेट परिणाम भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होत आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणवळा शहर आणि परिसरात पर्यटकांना मज्जाव असल्याने परिसर सामसूम दिसत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होताच हजारो पर्यटकांची पाऊले लोणावळ्याच्या दिशेने आपोआप वळत . परंतु, यावर्षीचे चित्रच वेगळे आहे. लोणावळा शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु, गेल्या २४ तासात समाधानकारक पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले असून ८१मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेरीस एकूण १ हजार ५९१  मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३८४ मिलिमीटर पाऊस झाला होता. तसेच एकूण पावसाची नोंद ही ४ हजार १७६ एवढी होती. त्यामुळे आणखी पावसाची गरज असल्याचे लोणावळाच्या स्थानिक नागरिकांच्या म्हणने  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:32 pm

Web Title: lonavla receives 81 mm of rainfall in 24 hours msr 87 kjp 91
टॅग : Monsoon
Next Stories
1 निर्मितीचे डोहाळे लागलेले देखणे हात म्यान
2 रुग्ण दुप्पटीचा कालावधी २२ दिवसांवर
3 शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा?
Just Now!
X