News Flash

लोणावळा पश्चिम भारतातील दुसरे स्वच्छ शहर

स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती.

(संग्रहित छायाचित्र)

अभियान सुरू होण्यापूर्वी शहरात स्वच्छता मोहीम; नगरपरिषद पुरस्काराने सन्मानित

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराने पश्चिम भारतात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्या या गटात लोणावळा शहराने हा क्रमांक पटकाविला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा होतो. त्यामुळे स्वच्छतेबाबत पर्यटकांचे प्रबोधन करण्यात आले. पर्यटनस्थळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे फलक लावण्यात आले होते. नगरपरिषदेकडून शंभर टक्के कचरा गोळा केला जात आहे. लोणावळा शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. लोणावळ्यातील वरसोली भागातील कचरा डेपोत बायोगॅस प्रकल्प तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात आला आहे.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या सभापती संध्या खंडेलवाल, पूजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. मावळचे भारतीय जनता पक्षाचे आमदार बाळा भेगडे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे आदी उपस्थित होते.

कामगिरी उंचावली

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा सातव्या क्रमांकावर होते. स्वच्छता मोहीम तसेच सामूहिक प्रयत्नांमुळे पर्यटननगरी म्हणून ओळख असलेले लोणावळा पश्चिम भारतातील दुसरे स्वच्छ शहर ठरले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहर पश्चिम भारतातातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले. दिल्लीतील कार्यक्रमात बुधवारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा शहराला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, सचिन पवार आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 12:40 am

Web Title: lonavla the second clean city in western india
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी
2 नाटक बिटक : स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रागतिक स्त्रीची कहाणी
3 राफेल घोटाळा झाकण्यासाठीच फाईल जाळली असावी-अजित पवार
Just Now!
X