तब्बल अडीच महिन्यानंतर लोणावळ्यातील दुहेरी हत्त्येप्रकरणातील दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी रविवारी लोणावळ्यातून एका आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर  सोमवारी आग्र्यातून दुसऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकाने श्रुती आणि सार्थक या विद्यार्थ्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर  विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे-पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून याप्रकरणातील आरोपींची माहिती दिली. सलीम शेख आणि असिफ शेख  अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले की, सिंहगड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा सार्थक दिलीप वाकचौरे (वय २२ रा. चणेगावरोड, सात्रळ राहुरी, सोनेगाव, जिल्हा अहमदनगर) आणि संगणकीय अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारी श्रुती संजय डुंबरे (वय २१ रा. ओतूर गेस्ट हाऊसजवळ, ता. जुन्नर, जिल्हा पुणे) हे दोघे जण २  एप्रिल रोजी लोणावळयातील आयएनएस पॉईंटला फिरायला गेले होते. यावेळी सलीम शेख आणि असिफ शेख या दोन आरोपींनी चोरीच्या उद्देशाने सार्थक आणि श्रुतीला झाडीत घेऊन गेले. याठिकाणी त्यांनी मुलाचे कपडे काढले. जेव्हा ते मुलीचे कपडे काढायला गेले. तेव्हा सार्थकने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. सार्थकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर श्रुतीने आक्रोश केला पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी तिचा गळा आवळून खून केला.

sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

या प्रकरणी २ प्रत्यक्षदर्शी मिळाले असून यातील मुख्य आरोपीवर ३९४ आणि ३९५ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या सदर्भात चौकशी दरम्यान आणखी एक माहिती मिळाली आहे. हे आरोपी तरुण जोडपे दिसले की त्यांना कपडे काढायला लावायचे. या प्रकारचे त्यांच्यावर २ गुन्हे दोखील नोंद आहेत. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. या बक्षीस जारी केल्यामुळे पोलिसांना अधिक माहिती मिळण्यास मदत झाली. या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या तपास पथकाच्या टिमला नांगरे पाटील यांच्याकडून ४० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले.