News Flash

टोकनसाठी पहाटे पाचला या!

अ‍ॅपवरील नोंदणीची प्रक्रिया महापालिके कडून पायदळी

अ‍ॅपवरील नोंदणीची प्रक्रिया महापालिके कडून पायदळी

पुणे : लसीकरणसाठी को-विन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करूनही लस मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. अ‍ॅपवर नोंदणी केली तरीही लसीकरण केंद्रात जाऊन नागिरकांना टोकन घ्यावे लागत आहे.  टोकन घेण्यासाठी पहाटे पाच वाजता या, असेही नागरिकांना सांगितले जात असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने पूर्व नोंदणी करण्याची प्रक्रिया महापालिके ने पायदळी तुडवल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन-दोनदा कराव्या लागत असलेल्या नोंदणीचा अतोनात त्रास नागरिकांना होत असून त्याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरणाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. मात्र लसीची पहिली मात्रा घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातच आता केंद्रातील कर्मचारी ज्या पद्धतीने सांगतील, त्याप्रमाणे त्यांना लसीकरणासाठी केंद्रात यावे लागत आहे. को-विन आणि आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी के ल्यानंतरही या नोंदणीला काहीच महत्त्व दिले जात नसल्याचेही दिसून येत आहे. शहरातील अनेक नागरिकांना असे अनुभव रोज येत आहेत. कोथरूडचे रहिवासी असलेल्या संजय पुरंदरे यांनाही असाच अनुभव आला. तो अनुभव त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला.

‘साठ वर्षांवरील वयोगटात असल्याने पहिली मात्रा घेतली. दुसऱ्या मात्रेसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग के ले. त्या वेळी हडपसरमधील अण्णासाहेब मगर रुग्णालयातील नऊ ते अकरा या दरम्यानची वेळ  उपलब्ध झाली.

पावणेनऊच्या दरम्यान केंद्रावर गेलो असता स्लॉट बुकिं गवर कोणतीही वेळ मिळाली तरी पहाटे पाच वाजता येऊन रांगेत उभे राहाणे आवश्यक आहे. लशींच्या जेवढय़ा मात्रा येतील तेवढय़ाचे टोकनचे वाटप के ले जाते,’ असे पुरंदरे यांना सांगण्यात आले.

ज्यांना टोकन मिळाले नाही, त्यांना केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे ऑनलाइन स्लॉट बुकिं गला काय अर्थ राहिला, असा प्रश्न पुरंदरे यांनी उपस्थित के ला. ज्येष्ठ नागरिक मोबाइल अ‍ॅप, संके तस्थळ वापरून स्लॉट बुकिंग करण्यात तेवढे तंत्रस्नेही नसतात. त्यानंतरही नोंदणी करून जर पहाटे पाच वाजता रांगेत उभे राहायचे असेल, तर ऑनलाइन बुकिं गचा अट्टहास कशासाठी असा सवालही पुरंदरे यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:07 am

Web Title: long queues at vaccination sites for token in pune zws 70
Next Stories
1 लसीकरण केंद्रे नगरसेवकांच्या ताब्यात
2 पाणीपुरवठय़ाला अर्थपुरवठय़ाअभावी फटका
3 पुण्यात पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे..
Just Now!
X